द चेंबर

पुस्तकाचे नाव - दिले चेंबर
लेखक -  जाॅन ग्रिशॅम
अनुवाद - विश्वनाथ केळकर




सॅम केहाॅल आपल्या तारुण्यावस्थेत वंशविद्वेषी, ज्यू द्वेष्टे, दहशतवादी क्लॅन संघटनेचे सदस्य होते. बॉम्ब स्फोट करून हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप सिद्ध होऊन देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 

बाॅम्ब स्फोट झाल्यावर लगेच सॅमला पकडण्यात आले होते. हत्येचा आरोप नाकारतांना तांत्रिक कारणाने स्फोट उशिरा झाला. हत्या करण्याचा उद्देश नव्हता. असा त्याचा बचाव होता. एका पुरोगामी श्रीमंत ज्यू उद्योग वकिलाच्या ऑफीसमध्ये पहाटे पाच वाजता स्फोटके लावून एका तासाने म्हणजे सहा वाजता स्फोट होईल असे टायमर लावले होते. काहीतरी चूक झाली. स्फोट सहा ऐवजी आठ वाजता होवून प्राणहानी झाली होती. त्यात तो वकील जबर जखमी झाला. त्याची पाच वर्षाची दोन्ही जुळी मुले वाचू शकली नाही. 

पहिल्यांदा खटला चालला तेव्हा ज्युरींचे निर्णय ठराविक बहुमताने न झाल्याने खटला निकाली निघाला. त्यानंतर काही वर्षांनी परत खटला उभा राहिला पण त्याच कारणाने निकाली न निघाल्याने परत सॅमची सुटका करावी लागली. तिसऱ्यांदा खटला उभा करतांना एफबीआय ला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.  यावेळी मात्र खटला निकाली निघून सॅम केहाॅल ला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. 

गुन्हा घडल्यानंतर तेवीस वर्षांनंतर, सॅमने वयाची सत्तरी गाठल्यावर  शिक्षेच्या अंमलबजावणी ची तयारी चालू झाली. 

या दोन दशकात सॅम कुटुंबापासून दुरावत राहीला. कोणालाही त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत नव्हती. त्याच्या अपराधाने नाचक्की होऊ नये म्हणून सगळे त्याला टाळू लागले होते.  त्याच्या मुलाने तर आपले नाव कायदेशीर रित्या बदलून सॅमशी सगळे संबंध तोडून टाकले. 

क्रॅव्हिट्झ आणि बेन ही तिनशे वकीलांची कंपनी जमेल त्या मार्गाने खोऱ्याने पैसे कमवीत होती. सहाजिकच इतर पैसे मिळवणाऱ्या कंपन्याप्रमाणे ही कंपनी सुध्दा नफ्यातील काही हिस्सा समाजासाठी खर्च करायचा याची जाण ठेवून मृत्यूदंड दिलेल्यांचे वकीलपत्र घेऊन शिक्षा कमी करण्यासाठी खटले लढायची व मृत्यु दंड दिलेल्या आरोपीच्या कुटुंबाचे पुनर्वसन करायची. 

याच कंपनीने सॅम केहाॅलचे अगोदर वकीलपत्र घेतले होते. पण ज्यू वकील असल्याने सॅमने या कंपनीची सेवा नाकारली होती. 
आता परत याच कंपनीकडून ऍडम हाॅल हा तरुण वकील सॅम केहाॅलचे वकीलपत्र घेऊन लढणार होता. कमीतकमी मृत्यू दंड टाळण्याचा प्रयत्न करणार होता. तुरुंगात त्याने सॅमला आपली ओळख करून दिली ती त्याचा नातू म्हणून. सॅमशी संबंध तोडून नाव बदलेल्या मुलाचा मुलगा. 

सॅमने अगोदर केलेले सगळे अर्ज निकाली निघून त्याच्या मृत्यू दंडाच्या शिक्षेची अमलबजावणी करण्याचा दिवस नक्की करण्यात आला होता. ऍडम कडे आपल्या आजोबांची मृत्यू दंडाच्या शिक्षेवर तहकूबी मिळवण्यासाठी होते फक्त चार आठवडे... 

ऍडमने आता कोर्टात एकामागून एक अर्ज दाखल करायला सुरुवात केली. सुरु झाली कायद्याची लढाई. त्यात काही सामाजिक संघटना सॅमच्या शिक्षेच्या विरोधात तर काही शिक्षेच्या समर्थनार्थ आंदोलन करू लागल्या. दिवस जात होते, ऍडमची धावपळ वाढत होती. कायद्याच्या पुस्तकात मृत्यू दंड टाळण्याचा मार्ग सापडतो का, याचा शोध घेत होता. हळूहळू सॅमचा धीर खचू लागला होता. मात्र ऍडमने मात्र आशा सोडली नव्हती..... 

कथानक उत्कंठावर्धक असले तरीही काहीसे संथ वाटते. 









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.