( १४ मार्च १९५३ - २० डिसेंबर २००९ )


न
दलित साहित्य अखिल भारतीय स्तरावर तसेच जागतिक स्तरावर नेण्याचे काम करणे हीच जीवननिष्ठा, असे मानणारे ते धडाडीचे लेखक आणि कवी आहेत. मुंबई आणि हैद्राबाद या दोन्ही उच्च न्यायालयांनी संशोधन ग्रंथ म्हणून मान्यता दिलेल्या ‘रामायणातील संस्कृती संघर्ष’ (१९८२) या ग्रंथांच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. या ग्रंथाचे भाषांतर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत करण्यात आले.
‘जनता पत्रातील लेख’, ‘धर्मांतराची भीमगर्जना’, ‘चीवर’, ‘युगप्रवर्तक डॉ.आंबेडकर’, ' चळवळीचे दिवस' ‘वाद-संवाद’ या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला. ‘अरुण कृष्णाजी कांबळे’, तसेच ‘मुद्रा’ हे त्यांचे कविता संग्रहही लक्ष्यवेधी ठरले. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू तसेच जर्मन व फ्रेंच या भाषांमध्ये भाषांतरित झाल्या.
मिशिगन युनिव्हर्सिटी जर्नलमध्ये त्यांची कविता मुखपृष्ठावर प्रसिद्ध होण्याचाही मान त्यांना मिळाला. १९९६ साली वर्धा येथे झालेल्या तिसर्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पहिल्या जागतिक बुद्ध-फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचेही (कल्याण २००२) ते अध्यक्ष होते, २००२ साली झालेल्या ‘वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्स’चेही अध्यक्षपद त्यांना लाभले.
( संकलीत)