कुमुदिनी रांगणेकर
( २५ मार्च १९०६ - १६ मार्च १९९९ )
कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार. ‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले.
त्यांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले.‘अनियमित जग’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी. ‘प्रीतीचा शोध’, ‘फुललेली कळी’, ‘शकुनी मोहर’, ‘हरपलेलं गवसलं’, ‘क्षणाचं वैधव्य’ या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबर्या आहेत.
‘चार उणे एक बरोबर दोन’, ‘स्वप्नातली कळी’, ‘मखमली वल्ली’ , ‘मर्मबंध’, ‘सोन्याची शिडी’, ‘गंधाविना चंदन’, ‘स्वप्नाळू प्रीतशकुनी मोहर’, ‘एकेरी गाठ’ , ‘कल्पना’ , ‘बेसूर संगीत’, ‘विरलेले वस्त्र’ , ‘परतदान’, ‘माळावरील खून’ , ‘पुनर्जीवन’ , ‘पैजेचा विडा’, ‘प्रीतीचा गोलघुमट’ , ‘मोही नयना मना’ , ‘रिती ओंजळ’ , ‘कवठी चाफा’, ‘काजळरात’, ‘चकवा’ , ‘कुस्करलेलं हृदय’, ‘कडू अमृत’, ‘एकलीच दीपकळी’, ‘एकटी दुकटी’ , अशा आणखी कादंबर्या आहेत.
त्यांच्या कादंबर्यांची शीर्षके अर्थपूर्ण व आकर्षक असत.रांगणेकरबाईंची मख्मली वल्ली ही बालकुमारांसाठीची साहस कादंबरी Baroness Orczy हिने लिहिलेल्या Beau Bracade या कादंबरीचा अनुवाद आहे. 'लांडा कारभार' हा पी.जी. वुडहाऊसच्या कादंबरीचा अनुवाद आहे.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक)