रा. ना. दांडेकर

रा. ना. दांडेकर





 ( १७ मार्च १९०९ - ११ डिसेंबर २००१ ) 

मराठी, संस्कृत व इंग्लिश या भाषांमधून विपुल लेखन करून आपल्या विद्वत्तेची वारंवार प्रचिती आणून दिली आहे. या सर्वांत महत्त्वाचा ठरू शकेल, असा ग्रंथ म्हणजे त्यांनी केलेली वैदिक ग्रंथांची, लेखांची सूची वैदिक बिब्लिओग्रफी - पाच भागांमध्ये) प्रसिद्ध केली. सुरुवातीला कोणत्या नियतकालिकातून लेख, परीक्षणे घेतली आहेत, त्यांची सूची आहे. नंतर विषयवार विभागणी करून (सुमारे १९० वर्ग) पुस्तके व लेख यांची यादी दिली आहे. अभ्यासकाला ही सूची त्याच्या मार्गदर्शकाइतकीच मार्गदर्शक ठरते.



त्यांची ग्रंथसंपदा मोजकी असली, तरी ती मूल्यवान आहे. त्यांच्या ग्रंथांपैकी ‘वैदिक देवतांचे अभिनव दर्शन’, ‘अ हिस्टरी ऑफ द गुप्ताज’, ‘सम अस्पेक्टस ऑफ द हिस्टरी ऑफ हिंदूइझम’, ‘सुभाषितावलि’, ‘रसरत्न प्रदोपिका’, ‘श्रौतकोश’ (सहकार्याने), महाभारत (काही पर्वे त्यांंनी संपादिली) वगैरे प्रसिद्ध  आहेत. अनेक देशी-परदेशी महत्त्वाच्या नियतकालिकांच्या संपादकीय मंडळांवर ते होते. भारतीय व भारताबाहेरील विशेषत: संस्कृत, भारतविद्या, प्राच्यविद्या यांविषयक काम करणाऱ्या अनेक विद्यापीठांशी त्यांचा संबंध आला. अनेक संस्कृत संमेलनांमध्ये सदस्य, निमंत्रित सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष अशी सन्माननीय पदे त्यांना मिळाली आहेत. 

( संदर्भ - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.