( १९ मार्च १९३८ )
मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.सई परांजपे हे नाव त्यांच्या बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरुवातच मुळात बाल वयातील लेखीका म्हणून झाली. पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या.
बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिऱ्या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत.कथा, चष्मेबद्दूर अशा हलक्या फुलक्या चित्रपटापासून अंधांच्या मनोव्यथा सांगणारा स्पर्ष सारखा गंभीर चित्रपट दिग्दर्शित केला. अलबेला, जादूचा शंख, जास्वंदी, झाली काय गंमत अशी बालनाट्य लिहिली. त्याच सोबत नसिरुद्दीन शहा यांच्या आत्मचरित्राचा आणि एक दिवस या नावाने अनुवाद केला.
स्पर्श या चित्रपटाला १९८५ चा फिल्मफेअर चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. २०१८ साली अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्य पुरस्कार, शिवाय २००६ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
( संकलीत)