रिचर्ड बर्टन

रिचर्ड फ्रान्सिस बर्टन



(१९ मार्च १८२१-२० ऑक्टोबर १८९०) 


प्रसिद्ध इंग्लिश समन्वेषक, चतुरस्त्र  विद्यावंत, बहुभाषाविद, अरेबियन नाइट्सचा श्रेष्ठ इंग्रजी भाषांतरकार तसेच बहुप्रसू लेखक.   "माणसाला जे योग्य वाटते ते मनसोक्त करणे म्हणजे पुरुषार्थ" असे सांगणारा बर्टन. एकोणिसाव्या शतकात एवढं अद्भुत विलक्षण आणि नाट्यपूर्ण जीवन जगलेला दुसरा कुणी झालाच नाही. बाळ सामंत यांनी अनेक वर्ष प्रचंड अभ्यास तसेच देशा परदेशात ठिक ठिकाणी भेटी देऊन रिचर्ड बर्टन चे चरित्र या "शापित यक्ष" या पुस्तकात अतिशय ओघवत उत्तमरित्या रंजक शैलीत सादर केले आहे.




ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी पत्करून  हिंदुस्थानात आले. येथील त्याच्या वास्तव्यात त्याने अरबी, फार्सी, हिंदी (हिंदुस्थानी), मराठी वगैरे भाषा आणि अनेक बोली आत्मसात केल्या. (आयुष्याच्या अखेरीस त्यांना २५ भाषा व १५ बोली अवगत होत्या, असे म्हटले जाते). कराचीत असताना त्यांनी समलिंगी कुंटनखान्यावर लिहिले त्यामुळे  सैनिकी कारकीर्द संपुष्टात आली. 


हिंदुस्थानावर त्यांनी चार ग्रंथ लिहिले. त्यांपैकी सिंध अँड द रेसिस दॅट इन्‌हॅबिट द व्हॅली ऑफ द इंडस हा ग्रंथ विशेष गाजला. मुस्लिम यात्रेकरूच्या वेषात बर्टनने मक्का व मदिना या दोन पवित्र स्थळांची यात्रा करून
प्रवासातील आपले अनुभव पर्सनल नॅरेटिव्ह ऑफ पिल्‌ग्रिमेज टू एल् मदिना अँड मक्का या  प्रवासवर्णनात ग्रंथित केले आहेत. बर्टनच्या आयुष्यातील बराचसा काळ सफरी व लेखन-वाचनांतच गेला. त्यांचे विविध विषयांवरील पन्नासांहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध झाले असून त्याने अनेक ग्रंथांची भाषांतरे केली आहेत. त्यांपैकी लुझीअड्स  या पोर्तुगीज महाकाव्याचा तसेच अरेबियन नाइट्सचे १६ खंड  व कामसूत्र ऑफ वात्स्यायन  हे अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत. आयुष्याच्या अखेरीस त्यास सर हा किताब मिळाला . 

त्याच्या पत्नीने त्याचे चरित्र लिहिले आहे तथापि व्हिक्टोरियन काळातील सामाजिक व नैतिक संकेतानुसार आपल्या पतीवर दूर्वर्तनाचा आक्षेप येईल या  भीतीने  बर्टनचा द परफ्युम्ड गार्डन हा ग्रंथ, काही दैनंदिन्या, टिपनवह्या तिने नष्ट केल्या.
 ( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.