पुष्पा अनंत भावे
( २६ मार्च १९३९ - ३ ऑक्टोबर २०२० ) स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या, ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार, समांतर आणि स्वच्छ समाजनिर्मितीच्या राजकारणासाठी देखील भूमिका घेत सतत लढत राहिलेल्या लेखिका प्रा. पुष्पा भावे यांचे साहित्य-समाज आणि राजकीय चळवळीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे.
नाट्यसमीक्षा क्षेत्रातील त्यांचे लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण आहे .त्यांनी मराठी नाटय वाड्मय क्षेत्रातील समीक्षेचेे दालन समृद्ध केले आहे. त्यांची नाट्यसमीक्षा दिशादर्शक आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, सतीश आळेकर या दिग्गजांना त्यांच्या नाटकांबद्दल पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असायची.
त्या जरी अध्यापनाच्या क्षेत्रात असल्या तरी केवळ अध्यापनापुरते मर्यादीत न राहता प्रा. पुष्पा भावे यांनी समाजकारणाशी नाळ जोडली. राष्ट्र सेवा दल, लोकशाहीवादी चळवळ आदींंशी त्यांचा संपर्क विद्यार्थीदशेत असतानापासूनचा आहे. हाच संपर्क पुढे अधिक व्यापक झाला. त्या समाजकारणातही आल्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा प्रमुख आंदोलनांमध्ये त्यांचा आवाज प्रामुख्याने उठावदार राहिला.
( संकलीत)