(१७ जुलै १९३०- २६ मार्च २००८).
मराठीतील एक श्रेष्ठ कथालेखक आणि महाराष्ट्रातील दलित साहित्यविषयक चळवळीचे एक प्रमुख प्रवर्तक. लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी १९६८ साली रेल्वेच्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला. जेव्हा मी जात चोरली होती, (१९६३ ) मरण स्वस्त होत आहे (१९६९, कथासंग्रह) आणि सूड (१९७०, कादंबरिका) ह्या बागुलांच्या साहित्यकृती गाजल्या.
सामाजिक विषमतेचा बळी होऊन झोपडपट्टीत नाही तर गावकुसाबाहेर राहणारा दु:ख-दैन्याने ग्रासलेला आणि अन्याय-अत्याचारांविरुद्ध बंड करून उठणारा शोषित, दलित, अपमानित माणूस बागुलांच्या कथांचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या इच्छाआकांक्षांचा सुखदु:खांचा आणि वासना-विकारांचा शोध घेत असताना दाहक सामाजिक वास्तवाचे दर्शन बागुलांनी घडविले आहे.
त्यांच्या अनेक कथांचे गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून अनुवाद झालेले आहेत. १९६० नंतरचे मराठी साहित्याचे दशक ढवळून बागुलांच्या आघाडीच्या दलित साहित्यिकांत त्यांचा समावेश होतो. दलितांच्या वाङ्मयीन चळवळीला त्यांनी व्यापक मानवतावादी पायावर उभे केले. आहे. महाराष्ट्र बौद्ध साहित्यसभेने महाड येथे आयोजित केलेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९७२).
( संदर्भ - मराठी विश्वकोशविश्वकोश, अर्जुन ढांगळे)