नागनाथ कोत्तापल्ले

नागनाथ कोत्तापल्ले 



( २९ मार्च १९४८ - ३० नोव्हेंबर २०२२ ) 


मराठवाडा विद्यापीठात नंतर पुणे विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. 'मुड्स' हा त्यांचा कवितासंग्रह १९७६ साली प्रकाशितझाला. 'कर्फ्यू व इतर कथा', 'संदर्भ' हे दोन कथासंग्रह त्यानंतर प्रकाशित झाले.' कवीची गोष्ट 'आणि 'सावित्रीचा निर्णय' हे दोन दीर्घ कथासंग्रह गाजले. ' गांधारीचे डोळे ',  ' मध्य रात्र ' या कादंबऱ्या सहित इतरही बरेच ललित साहित्य प्रसिद्ध आहे. ' साहित्याचा अन्वयार्थ ', ' आधुनिक मराठी कविता ', ' ग्रामीण साहित्य स्वरूप आणि बोध ' असे समीक्षा लेखनही त्यांनी केले. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएच.डी. पदवी संपादन केली. 


महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (१९८८-१९८९), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. 


मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथील मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच २०१२ साली झालेल्या चिपळूण येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. . राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. 


( संकलीत)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.