( २४ सप्टेंबर १९२२ - ३० मार्च १९८९ )
पैंजण बुवा कादंबरी या मासिकांचे त्यांनी संपादन केले. खऱ्या अर्थाने १९६४ साली सुरू झालेल्या सोबत साप्ताहिकांमुळे ते प्रकाश झोतात आले. ह्याचे ते संस्थापक संपादक होते. त्यांची त्या साप्ताहिकात कटाक्ष व गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती.
सोबत हे केवळ साप्ताहिक नव्हते तर वैचारीक व्यासपीठ होते जिथे सगळ्या विचारांना मुक्त संचार होता. अनेक वेगवेगळ्या विचारांचे लेख वाचण आणि मनसोक्त वादविवाद होण हे त्या व्यासपीठावर होत. अर्थात स्वत: बेहेरे हिंदुत्ववादी असल्याने साप्ताहिकावर छाप हिंदुत्वाचीच होती, पण इतरांचा आवाज कधीच दाबला गेला नाही. विरोधी टिका सर्रास पणे सोबत मध्ये छापुन यायची. शुध्दलेखनातल्या चुका सोडल्या तर श्री. बेहेरे यांनी कोणाचे विचार संपादीत केले असतील याची शक्याताच नाही.
साप्ताहीक ९० % वाचक/वर्गणीदारांवर चालायचे. एखादीच जाहीरात मिळायची. गंगाधर गाडगीळ, रत्नाकर मतकरी,सुभाष भेंडे, बाळ सामंत, वि अ बुवा,अनंत मनोहर अशा लेखकांना लेखनासाठी उद्युक्त केले. बेहरे यांचे नऊ कथासंग्रह, वीस कादंबऱ्या, ललित गद्याची नऊ पुस्तके एक कवितासंग्रह दोन नाटके आणि अन्य लेखन पुस्तक रूपात प्रकाशित झाले असून त्यांचे आनंद यात्रा हे आत्मचरित्र बहुचर्चित ठरले त्यांच्या अंकुर या कादंबरीवर सी रामचंद्र यांनी घरकुल हा मराठी चित्रपट बनवला.त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या इरिगेशन मॅन्युअल या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून रोख रक्कम व रावसाहेब ही पदवी मिळाली होती. १९८६ साली रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले होते.
( संकलीत)