(२८ मार्च १८६८ — १८ जून १९३६ ). आंतरराष्ट्रीय कीर्तीचा रशियन लेखक. मूळ नाव अल्यिक्स्येई मक्स्यीमव्ह्यिच प्येश्कॉव्ह.. १८९९ ते १९१० ह्या काळात गॉर्कीने कथांबरोबरच काही कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. द मदर, १९२९ ही त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी ह्याच काळातली. मराठीत आई ह्या नावाने ही कादंबरी विनायक महादेव भुस्कुटे ह्यांनी अनुवादिली आहे ( १९४५ ).
क्रांतिकार्यावरील निष्ठा, तरुण क्रांतिकारकांचा मिळालेला सहवास आणि मान ह्यांमुळे एका भित्र्या, दडपलेल्या स्त्रीचे कोमल, ममताळू आणि निर्भय स्त्रीत कसे रूपांतर होते, त्याचे चित्र या कादंबरीत रंगविलेले आहे. ही कादंबरी समाजवादी वास्तववादाचा महान आदर्श म्हणून रशियन टीकाकारांनी गौरविली. लोअर डेप्थ्स, हे विख्यात नाटक त्याने याच काळात लिहिले. या नाटकाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली याचे एक कारण त्याची पार्श्वभूमीच खळबळजनक होती. गलिच्छ, गैरवर्तनी भिकाऱ्यांची वसती असलेले एक गृह ही त्याची पार्श्वभूमी आहे. गॉर्कीच्या लेखनात एरव्ही अनेकदा आढळून येणारी तत्त्वबोधाची आत्यंतिक प्रवृत्ती त्यांत नाही. त्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि विविध व्यक्तींची त्याने काढलेली शब्दचित्रे मनाची पकड घेतात. झारच्या कारकीर्दीत वाढलेली जुनी पिढी आणि बोल्शेव्हिक विचारांनी भारलेली नवी पिढी ह्यांच्या संघर्षाचे चित्रण करणाऱ्या कादंबरीचे चार खंड बायस्टँडर , द मॅग्नेट , अदर फायर्स आणि द स्पेक्टर , ह्या नावांनी अनुवादित झालेले आहेत. रशियाबाहेरचे टीकाकार गॉर्कीला एकोणिसाव्या शतकातील वास्तववादाचे शेवटचे प्रकरण म्हणून संबोधतात.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)