( २७ नोव्हेंबर १८७० - ३१ मार्च १९२६ )
इतिहास संशोधक, संग्रहक, लेखक व चतुरस्र कार्यकर्ते . त्यांनी लिहिलेले लक्ष्मीबाईंचे चरित्र अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेव्हापासून त्यांनी अस्सल कागदपत्रे, वस्तू, चित्रे वगैरेंच्या संदर्भात संग्रह संपादन, लेखन, प्रसिद्धी, संकलन वगैरे अनेक दृष्टींनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली.
पेशवे दप्तरातील निवडक पत्रे अलीकडे ४५ भागात प्रसिद्ध झाली. त्यांपैकी पुष्कळ पत्रे आधीच त्यांनी तेथे नेऊन निवडून व नकलून ठेवली होती. त्या वेळी त्यांना ती प्रसिद्ध करणे शक्य झाले नाही. त्यांच्या इतिहासक्षेत्रातील कार्यास खरे व राजवाडे यांच्या पूर्वीच सुरुवात झाली. त्या क्षेत्रातील यांची कामगिरी बहुविध आणि प्रचंड स्वरूपाची आहे. त्यांचे वाङ्मय कीर्तिमंदिर झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र, मराठ्यांचे पराक्रम- बुंदेलखंड प्रकरण, अयोध्येचे नवाब , मुसलमानी आमदानीतील मराठे सरदार, महापुरुष ब्रह्मेन्द्रस्वामी धावडशीकर यांचे चरित्र व पत्रव्यवहार, दिल्ली अथवा इन्द्रप्रस्थ, मराठ्यांचे आरमार ,सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार,स्वल्पमूल्यचरित्रमाला. पेशवे दप्तरातील निवडक उतारे, वगैरे अनेक अस्सल पत्रव्यवहार त्यांनी इतिहाससंग्रहातून प्रसिद्ध केले.