( २४ एप्रिल १८९६ - ४ जुलै १९८० )
आपल्या साहित्यातून ग्रामीण जीवन व त्यातील प्रश्न हाताळताना चित्तथरारक प्रसंगांना ग्रामीण निसर्गाच्या प्रत्ययकारी चित्रणाची जोड दिली. पकड घेणारा संघर्ष व रसरशीत शरीरप्रणय यामुळे त्यांच्या कादंबर्या आकर्षक ठरल्या.
त्यांच्या साहित्यातील सर्वच व्यक्तिरेखांना कृषिसंस्कृतीचा अस्सल स्पर्श आहे. डोंगरदर्या, पहाड, वनराई, शेती यांच्यात मनाने व शरीराने गुंतून असणारी गावरान माणसे त्यांच्या कादंबर्यांत जिवंत होतात. कोरडवाहू जमिनीतील शेती, खेड्यातील अस्पृश्यतेचा प्रश्न, कूळकायद्यानंतर जमीनदार व कुळे यांच्यातील बिघडलेले संबंध, हे विषय दिघ्यांनी मनःपूर्वक, समरसून हाताळले आहेत.
ग्रामीण कादंबरीच्या इतिहासात दिघ्यांचे स्थान निर्विवादपणे महत्त्वाचे आहे. दिघे यांच्या कादंबर्यांवर मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये चित्रपट निर्माण झाले आहेत. ‘पाणकळा’ कादंबरीवर ‘मदहोश’ हा हिंदी, ‘धरतीची लेकरं’ हा मराठी व ‘कार्तिकी कादंबरीवर ‘कार्तिकी’ हा मराठी असे चित्रपट निघाले असून ‘कार्तिकी’ चित्रपटास भारत सरकारचे उत्कृष्ट निर्मितीचे पारितोषिक मिळाले आहे.
( संदर्भ - महाराष्ट्रनायक)
( संदर्भ - महाराष्ट्रनायक)