वसंत पोतदार

वसंत गोविंद पोतदार 


(२० नोव्हेंबर १९३९ - ३० एप्रिल २००३) 

हे मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार आहेत. पोतदारांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. नंतर ‘सेर शिवराज’ (शिवाजी), ’एका पुरुषोत्तमाचा गाथा (पु.ल. देशपांडे), ‘योद्धा संन्यासी’ (विवेकानंद), महात्मा फुलेंसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांवर आधारले एकूण १० हिंदी-बंगाली-मराठी एकपात्री नाट्यप्रयोग करत ते ४० वर्षे देशात आणि परदेशांतही फिरले.



वसंत पोतदारांनी मराठी, हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर स्फुट लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या अग्निपुत्र या पुस्तकात चंद्रशेखर आझाद, जतींद्रनाथ दास, बटुकेश्वर दत्त्त, राजगुरू, सुखदेव अन् भगतसिंग यांचेबद्दल  नेमकी माहिती मिळते. माहोर, मलकापूरकर अन् वैशंपायन असे अज्ञात वीरहि ज्ञात होतात. 



अजब आजाद मर्द हे मिर्झा गालिब वर आधारित, तोची साधू ओळखावा हे गाडगे महाराजांचे चरित्र,
गाडगे महाराज -अनोख्या समाजसुधारकाची रसाळ कहाणी , योध्दा सन्यासी हे स्वामी विवेकानंद यांचे चरित्र अशी अनेक पुस्तके लिहिली. कुमार गंधर्व याच्यावर आधारित कुमार या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. 

( संकलीत)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.