एलिस्टर मॅकलीन

एलिस्टर मॅक्लिन 



( २१ एप्रिल १९२२ - २ फेब्रुवारी १९८७ ) 


१९४१ साली त्यांनी नौदलात अधिकारी म्हणून प्रवेश केला आणि दुसऱ्या महायुद्धातही भाग घेतला. नौदलातून बाहेर पडल्यावर ते शिक्षक म्हणून काम करू लागले व अर्थाजनासाठी लघुकथा लिहू लागले. एका प्रकाशन संस्थेने दिलेला कादंबरी लिहिण्याचा प्रस्ताव स्वीकारून युद्धाच्या अनुभवावर एचएमएस युलीसीस ही कादंबरी लिहिली. 




याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यावर पूर्णवेळ युद्ध कथा,  गुप्तहेर कथा, साहस कथा लिहिण्यास सुरुवात केली. मुखपृष्ठावर एलिस्टर मेकलीन हे नाव आहे म्हणून नव्हे तर साहित्य दर्जेदार आहे म्हणून लोकप्रिय आहे हे दर्शवून देण्यासाठी इयान स्टुअर्ट या नावाने  लिहिलेल्या दोन कादंबऱ्या ही लोकप्रिय झाल्या. प्रणयाची भडक वर्णने त्यांच्या लेखनात आढळत नाही. त्यांचा नायक प्रतिकुल परिस्थितीला, शत्रूंचा सामना करतांना मानवी क्षमतेच्या टोकाला जातो. निसर्ग त्यातूनही समुद्रातील पार्श्वभूमीचा कादंबऱ्यात विशेष वापर केला गेला आहे. 




मॅकलीन यांच्या २८  कादंबऱ्या व काही कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.द गन्स ऑफ नॅव्हारान, गोल्डन गेट,व्हेअर इगल्स डेअर, द फिअर इज द की, डार्क क्रुसेड, द गोल्डन रान्देऊ, द सटन बग या त्यापैकी काही. त्यांच्या  कादंबऱ्याचे अनेक भाषेत भाषांतर झाले व अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आहेत. १९८३ साली ग्लासगो विद्यापीठाकडून  त्यांना साहित्यासाठी डॉक्टरेट देऊन गौरवण्यात आले.

( संकलित) 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.