डॉ. गुंथर सैन्थांयमर

डॉ. गुंथर सोन्थांयमर 




( २१ एप्रिल १९३४ - १ जुन १९९२ ) 

प्राच्यविद्या आणि भारतीय विद्या या विषयांवर पाश्चात्त्य संशोधकांनी गेल्या शे-दीडशे वर्षांत प्रचंड संशोधन केले. त्यात मराठी संस्कृतीसाठी वाहून घेतलेल्या आणि ‘गुरुणां गुरू’ म्हणून ओळखले गेलेल्या, जर्मनी येथील हायडेलबर्गच्या डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे नाव महत्त्वाचे. 





पुस्तकी ज्ञानापेक्षा भटकंतीतून मिळणारा अनुभव त्यांना महत्त्वाचा वाटला. खंडोबा आणि धनगर जमात यांचा अभ्यास करताना सातत्याने त्यांचा मुक्काम जेजुरीत असे. तिथल्या वास्तव्यात खेड्यातील जानपद मराठी भाषा त्यांच्या तोंडी असे. लोकदेवतात वीरगळ (ज्यावर त्यांनी पुढे ‘हिरोस्टोन’ नावाचा संशोधनात्मक ग्रंथ काढला.) विठोबा, म्हस्कोबा, यमाई-तुकाई, मरिआई या विषयाच्या अभ्यासासाठी, देवतांच्या स्थानासाठी ते महाराष्ट्र कर्नाटकात खूप हिंडले. धनगर मंडळींच्या वस्त्यावर राहिले. त्यांची गाणी ध्वनिमुद्रित केली, त्यांच्या जत्रा-यात्रात भाग घेतला, त्यावर त्यांनी संशोधनात्मक लेखन केले, शोधनिबंध वाचले. काही मंडळी तर त्यांच्या आप्ताइतकी जवळची झाली होती. त्यांनी व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’चे जर्मन भाषांतर केले होते.
     पंढरपूरची वारी, पालखी सोहळा हा गुंथर यांच्या अति जिव्हाळ्याचा विषय. वारीवर त्यांनी १९८९मध्ये एकूण दीड तासांचा एक सुंदर माहितीपट काढला. हा लघुपट प्रथम प्रदर्शित करण्याचा मान जर्मन दूरचित्रवाणीने घेतला.मृत्यूनंतर आपल्या कलेवराचे दहन करावे आणि रक्षा जेजुरीला कऱ्हेच्या  पात्रात टाकावी, असे मरण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवले होते. त्यानुसार अस्थी पुण्यात भांडारकर ग्रंथालयात ठेवल्या होत्या.( संदर्भ - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.