वीरसेन आनंदराव कदम हे मुळ नाव. त्यांचे वडील रेस कोर्स वर अधिकारी म्हणून कार्यरत होते त्याचाच परिणाम त्यांच्या लेखनात झाला. त्यांची अजिंक्यतारा कथा रेस कोर्सच्या जीवनावर आधारित आहे. १९६५ साली त्यांची पहिली कादंबरी प्रलय प्रसिद्ध झाली यावर पुढे देवा शपथ खरं सांगेल हा चित्रपटही निघाला. १९६६ ला इन्साफ या कादंबरीवर अधिकार हा चित्रपट निघाला.
सुमारे ८० च्या आसपास कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या व्यक्तीचित्रण करणाऱ्या लेखमाला ही त्यांनी वर्तमानपत्रातून चालवल्या.बालपण संस्थानी वातावरणात गेल्यामुळे व वकीली पेशामुळे कथानकात ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी बोली, पोलीस, कायदा, कोर्ट सहजपणे उभ्या केले.
विषयातील विविधतेमुळे त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या इतक्या की त्यांच्या कादंबऱ्यांच्या तीन-तीन प्रती ठेवूनही वाचकांची मागणी पूर्ण करणे ग्रंथपाला नाही शक्य होत नव्हते. सामना ही खिसे कापू तरुणी वरील, अजिंक्य ही रेस वरील, संस्थानिकांच्या राहणीमानावर शोभा ही कादंबरी, स्वतःच्या बालपणाच्या आठवणीवर शाळा सुटली पाटी फुटली अशा कितीतरी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लिहिले. पु ल देशपांडे यांच्या कथेवरील नवरा-बायको या चित्रपटातही त्यांनी काम केले.
( संकलीत)