डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 




(५ सप्टेंबर १८८८ –१७ एप्रिल १९७५) 

भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७)  पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे.



त्यांनी तत्व चिंतनात स्वतःची अशी कोणतीच भर घातली नाही अशी टीका पुष्कळदा केली जाते.ती खरी ही आहे आणि खोटी ही आहे. खरी अशाकरता की आपल्या लिखाणात शंकराचार्यांच्या केवळ द्वैत मताची ही थोडी फेरमांडणी करून त्यांनी जी मांडणी केली ती आधुनिक साजेल अशी केली. नित्य परिवर्तनशील परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शाश्वत मूल्यांचे पुनर संस्करण केले. राधाकृष्णन यांनी मायावाद स्वीकारला जग ईश्वरावर अवलंबून आहे स्वप्रतिष्ठित नाही आणि अशाश्वत आहे असं त्यांनी त्याचा अर्थ केला. हिंदू धर्मास काही अर्वाचीन ग्रुप मिळाले आहे असे मानल्यास त्याचे श्रेय स्वामी विवेकानंद डॉक्टर भगवानदास महात्मा गांधी यांच्याप्रमाणे राधाकृष्णन यांनाही आहे. सर्व धर्मातील मूलभूत सत्य एकच आहे आणि ही वृत्ती हिंदू धर्माने जोपासली आहे असे राधाकृष्णन यांनी सांगितले. खरे तर धर्म एकच असतो संप्रदाय अनेक असतात याचा अर्थ असा नव्हे की कोणताही संप्रदाय व त्याच्या विशिष्ट परंपरा नाहीशा केल्या पाहिजेत.  इतकेच केले पाहिजे की संप्रदायांनी आपापली आग्रही वृत्ती सोडली पाहिजे. 




धर्म व तत्त्वज्ञान याप्रमाणे शिक्षण हाही त्यांच्या परिशीलनाचा विषय होता. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान झाले पाहिजे आणि आपल्या विचाराची दिशा ठरवता आली पाहिजे. असे त्यांचे मत होते स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे  (१९४८) ते अध्यक्ष होते त्यांच्या शैक्षणिक कार्य विषयी आदर व्यक्त करण्यासाठी व या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

१९५४ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

( संदर्भ - मराठी विश्वकोश) 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.