(२३ मे १८९६ – ९ नोव्हेंबर १९७७).
मराठीतील प्रसिद्ध संगीतसमीक्षक,केशवराव संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक.
‘एकलव्य’ ह्या टोपणानावाने केशवराव भोळे ह्यांनी वसुंधरा ह्या साप्ताहिकात लिहिलेले अभिजात गायक-गायिकांविषयीचे अनेक लेख त्यांच्या रमणीय शैलीमुळे आणि माहितगारीमुळे विख्यात झाले. तेच लेख पुढे आजचे प्रसिद्ध गायक (१९३३) ह्या पुस्तकात संगृहीत करण्यात आले. ह्या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती म्हणजे संगीताचे मानकरी (१९४९) होय.

त्यांनी नंतर ‘शुद्धसारंग’ ह्याही टोपणनावाने लेख लिहिले. त्यांत त्याची चिकित्सावृत्ती, परखडपणा, बोचरेपणा इ. विशेष दिसून येतात. आवाजाची दुनिया (१९४८), अस्ताई (१९६२), वसंतकाकाची पत्रे (१९६४), माझे संगीत (१९६४), अंतरा (१९६७) आणि जे आठवते ते (१९७४) हे आठवणीवजा आत्मचरित्र ही त्यांची ग्रंथसंपदा. पुणे येथे त्यांचे निधन झाले.
केशवराव भोळे ह्यांच्या जीवनाचे निर्मितिकाल आणि समीक्षाकाल असे प्रायः दोन भाग पडतात. त्यात त्यांच्या समीक्षाकालाचेही सामान्यतः दोन भाग पडतील : त्यांचे आरंभीचे लेखन चिकित्सेचे असूनही विधायक वृत्तीचे, सहृदयतेचे आणि रम्य शैलीने मंडित झालेले असे आहे. उत्तरकालीन लेखनात चिकित्सेसमवेतच परखडपणा, बोचरेपणा आणि कधीकधी बेभरवशी अशा अचिकित्सित आधारांवर निष्कर्ष काढण्याची घाई दिसून येते. तथापि एकूण त्यांच्या संगीतविषयक लेखनाचे संकलित रूप पाहता संगीताची रेखीव जाणकारी, अभिरुची, शिस्त ह्यांची जाणीव निर्माण करणारे ते एक समर्थ लेखक होत, ह्यात संशय नाही.

( संदर्भ - मराठी विश्वकोश )