(९ जानेवारी १९२७ - २४ मे २००४ )
सौंदर्यशास्त्र हा पाटणकरांच्या व्यासंगाचा व लेखनाचा खास विषय होय. क्रोचे व कांट यांच्या सौंदर्यशास्त्रीय विचारांचा चिकित्सक परिचय करून देणारे ग्रंथ ज्याप्रमाणे त्यांनी लिहिले त्याचप्रमाणे स्वतःची स्वतंत्र सौंदर्यमीमांसा विस्तृतपणे त्यांनी सौदर्यमीमांसा या मौलिक ग्रंथात मांडली. साहित्यसमीक्षेच्या संकल्पनात्मक विवेचनाला त्यांची सौंदर्यमीमांसा अत्यंत उपयुक्त ठरते.
पाटणकारंच्या सौंदर्यमीमांसेचे गुण व मर्यादा दाखवून देण्याचे कार्य प्रभाकर पाध्ये यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहून केले आहे. १९६९ साली इस्थेटिक्स अँड लिटररी क्रिटिसिझम हे त्यांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले.
त्यानंतर सौंदर्यमीमांसा (१९७४), क्रोचेचे सौंदर्यांशास्र : एक भाष्य(१९७४) व कांटची सौंदर्यमीमांसा (१९७७) ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. यांपैकी सौदर्यमीमांसा हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा असून त्यास साहित्य अकादेमीचा पुरस्कार व इतरही काही पुरस्कार प्राप्त झाले. यांखेरीज इतरही स्पुट समीक्षात्मक लेखन त्यांनी केलेले आहे. ‘अपूर्ण क्रांती’ या ग्रंथातील प्रमेयाचा पाठपुरावा करणारी लेखमाला ‘अनुष्टुभ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. ‘सौंदर्यमीमांसा’ या ग्रंथाची हिंदी, गुजराती भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. रा.भा.पाटणकरांनी सौंदर्यशास्त्रीय लेखनाच्या संदर्भात वेगळ्या सिद्धान्ताची मांडणी करून मराठी सौंदर्यशास्त्रीय लेखनामध्ये मोलाची भर घातली आहे. याचप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष साहित्यसमीक्षेतही अनेक अंगांनी साहित्यकृतींचा विचार केला आहे.
( संकलीत)