इयान फ्लेमिंग

इयान फ्लेमिंग 



( २८ मे १९०८ - १२ ऑगस्ट १९६४ )  

जेम्स बॉंड हा नायक असलेल्या बॉंड्‌स कथा लिहिणारे लेखक. 

'बर्ड्‌स ऑफ द कॅरिबियन' या नावाच्या एका उत्कृष्ट पुस्तकाच्या लेखकाचे नाव (जेम्स बॉंड), इयान फ्लेमिंगनी आपल्या नायकासाठी वापरले. अतिशय साधे, मवाळ, व निर्विकार असे हे नाव त्यांना आवडले. बॉंडचा अधिकृत नंबर (००७) किपलिंगने अमेरिकन रेल्वेसंबंधी एका कथेमध्ये एका नवीन इंजिनासाठी वापरला होता. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या मर्जीतील जॉन डी, स्पॅनिशांविरुद्ध ब्रिटिश गुप्तहेर खात्यात काम करताना ह्याच नंबरनी ओळखला जायचा.



जेम्स बॉंड या स्वप्नवत नायकाच्या निर्मितीमागे इयान फ्लेमिंग यांचा अफलातून मेंदू आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यांनी नौदल गुप्तहेर विभाग संचालकांचा पीए म्हणून काम केले. तेथे त्यांचा हुद्दा लेफ्टनंटवरून कमांडरपर्यंत वाढला. त्यांच्या युद्धकाळातील अनुभवांतून त्यांना गुप्त कारवायांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. 




युद्धानंतर फ्लेमिंग हे केम्स्ली न्यूज पेपर्समध्ये परराष्ट्र लेखन व्यवस्थापक बनले. त्यांनी जमैकामध्ये आपले 'गोल्डनएज' नावाचे घर बांधले. याच घरात १९५३मध्ये, वयाच्या ४२ व्या वर्षी इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉंड कादंब्यऱ्यांपैकी पहिली, 'कॅसिनो रोयाल' लिहिली. इयान फ्लेमिंग यांचं १९६४ मध्ये निधन झाले; पण तत्पूर्वी त्यांच्या १४ बॉंड कादंबऱ्यांच्या ४ कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या, आणि  जेम्स बॉंड हे पात्र जागतिक स्तरावर प्रस्थापित झाले. 


( संदर्भ - विकिपीडिया)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.