त्यांचे पहिले समीक्षा लेखांचे पुस्तक ‘गीतभान’च्या रूपाने १९८२ मध्ये प्रकाशित झाले. यातील भा.रा.तांबे, पु. शि. रेगे, अनंत काणेकर, इंदिरा संत, बा. भ. बोरकर, ग. दि. माडगूळकर इत्यादींविषयीची त्यांची काव्य-समीक्षा त्यांच्या सूक्ष्म, मर्मग्राही, रसिकतापूर्ण आणि प्रसन्न समीक्षा शैलीचा प्रत्यय देते. ‘मराठी रोमँटिक काव्यप्रतिभा’ (१९९९) व ‘बालकवींची कविता: तीन संदर्भ’ (१९९९) ही दोन पुस्तकेही मराठी काव्य-समीक्षेत मोलाची ठरतात.
आधुनिक मराठी काव्यातील रोमँटिसिझमच्या प्रभावाची तेंडुलकरांनी केलेली चिकित्सा मराठी समीक्षेत दुर्मिळ ठरते. त्याचप्रमाणे केशवसुत, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर यांच्याशी असलेला बालकवींच्या काव्यजाणिवेचा अंतरंग-संबंध तीन स्वतंत्र शोधलेखांतून त्यांनी उपरोल्लिखित पुस्तकात प्रभावीपणे उलगडून दाखविला आहे.
समीक्षकाप्रमाणेच त्यांच्या संशोधक वृत्तीचा प्रत्यय त्यांच्या काही साक्षेपी संपादनांमधूनही आपल्याला येतो. या संपादित ग्रंथांमध्ये ‘चौकोनी आकाश’ (अनंत काणेकरांच्या कविता, १९७४), ‘कविता दशकाची’ (८०च्या दशकातील दहा प्रातिनिधिक कवी, १९८०), ‘मृण्मयी’ (इंदिरा संत यांच्या निवडक कविता, १९८१) ‘आठवणीतल्या कविता’, भाग १ ते ४ (१९८९, १९९३, १९९५), ‘मराठी संशोधन’ खंड १३ व १४ (१९८१), ‘काव्यसरिता’ (१९५०), या ग्रथांचा समावेश होतो. तेंडुलकरांनी प्रारंभीपासून लिहिलेल्या कवितांचा ‘मानस-लहरी’ हा संग्रह त्यांच्या निधनानंतर असस प्रकाशन (त्यांच्या चिरंजीवाने काढलेली प्रकाशन संस्था) तर्फे प्रकाशित झाला.

प्राख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे ते वडील होते.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक)