आर. के. नारायण

आर. के. नारायण 



रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी हे लांबलचक नाव इंग्रजी प्रकाशक ग्रॅहम ग्रीन मुळे सुटसुटीत झाले. १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी असल्याची कल्पना करून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्‌स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली.





 त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. 




या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री. ज. जोशी यांनी केले आहे. आर. के. नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित एक दुरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.
साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. गाईड  साठी साहित्य अकादमी पुरस्कारासह त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


( विकिपीडिया)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.