जाॅर्ज ऑर्वेल

जाॅर्ज ऑर्वेल 



( २५ जुन १९०३ - २१ जानेवारी १९५० ) 

एरिक ऑर्थर ब्लेअर उर्फ जाॅर्ज ऑरवेल.इंग्लिश लेखक व पत्रकार. तीव्र बुद्धिमत्ता, चतुराई, सामाजिक विषमतेची सखोल जाण, एकाधिकारशाहीला कडवा विरोध, भाषेची सुस्पष्टता आणि लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजावादावरचा विश्वास इत्यादी वैशिष्ट्ये त्याच्या लेखनात आढळून येतात.ऑर्वेलने लेखनात कल्पनाधारित, तत्त्वनिष्ठ पत्रकारिता, साहित्यिक समीक्षा आणि काव्य असे नाना लेखनप्रकार हाताळले. 



त्याची नाइंटीन एटी-फोर (इ.स. १९४९ साली प्रकाशित) ही कादंबरी आणि उपहासात्मक लघुकादंबरी अ‍ॅनिमल फार्म (इ.स. १९४५ साली प्रकाशित) ह्या विख्यात साहित्यकृती आहेत. 



विसाव्या शतकात ह्या दोन पुस्तकांनी खपाचा उच्चांक गाठला होता. स्पॅनिश यादवी युद्धकाळात रिपब्लिकनांच्या बाजूने स्वयंसेवक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांवर त्याने होमेज टू कातालुन्या (इ.स. १९३८ साली प्रकाशित) हे पुस्तक लिहिले. त्याचे राजकारण, साहित्य, भाषा आणि संस्कृती या विषयांवरील अनेक निबंधही नावाजले गेले आहेत.
आधुनिक संस्कृती, राजकारणावरचा ऑर्वेलचा पगडा अद्यापही अबाधित आहे. त्याने भाषेला बहाल केलेल्या अनेक नवीन संज्ञांबरोबरच ऑर्वेलियन ही संज्ञा शब्दकोशांत समाविष्ट झालेली आहे.

( संदर्भ - विकिपीडिया)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.