( २७ डिसेंबर १९०४ - २३ जुन १९९४ )
यांनी नाटककार, समीक्षक, कादंबरीकार, चरित्रलेखक इत्यादी साहित्याच्या प्रांतांत भरीव कामगिरी केली असून त्यांना मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोशच म्हटले जाई.१९२७ मध्ये देसाईंनी ‘श्री’ व ‘कीचकवध’ ह्या नाटकांवर परीक्षण लिहिले. त्याच वर्षी बालगंधर्वांनी त्यांना म्हटले, “देवा, तसं नाटक तुम्ही आम्हांला लिहून दिलं पाहिजे. तुम्ही चांगलं नाटक लिहाल, असा माझा विश्वास आहे.” ‘विधिलिखित’ नाटक लिहून देसाई हे गंधर्व मंडळीचे नाटककार झाले. वकील वर्गाने या नाटकाबद्दल देसाईंचे अभिनंदन केले. देसाई लिहितात, “बालगंधर्वांच्या एका लहरीमुळे माझे नाटक त्यांच्या रंगभूमीवर येऊन माझ्यावर जो प्रकाश पडला, त्याचा मला जन्मभर उपयोग झाला. “माझे नाटक रंगभूमीवर आल्यानंतर खाडीलकर हे किती मोठे नाटककार आहेत, ते मला समजले.”देसाईंची साहित्य संपदा पुढीलप्रमाणे आहे- कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी, कलेचे कटाक्ष, मखमलीचा पडदा, नट, नाटक आणि नाटककार, विद्याहरणाचे अंतरंग,‘खाडीलकरांची नाट्यसृष्टी,किर्लोस्कर आणि देवल, गडकर्यांची नाट्यसृष्टी, ‘रागरंग,बर्लिनच्या बातम्या (कादंबरी). ‘विश्रब्ध शारदा’ खंड दुसरा- संगीत विभाग (संपादकीय टिपणे).
( संदर्भ - महाराष्ट्रनायक, वि ग जोशी)