(२५ सप्टेंबर १९२६ - ३० जुन १९९४ )
बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली नाटके भावनाप्रधान व कौटुंबिक असत. त्यांची बरेच नाटके अतिशय लोकप्रिय झाली. व्यवसायीक रंगभूमीसाठी त्यांनी नाटके लिहिली होती तरीही मुल्ये जपली होती. दुरीतांचे तिमीर जावो, वाहतो ही दुर्वाची जुडी, मुंबईची माणसं, एखाद्याचं नशीब अशा अनेक नाटकांचे हजारावर प्रयोग झाले.
त्यांनी तीसहून अधिक नाटके लिहिली. शहरी मध्यमवर्गीय नाटकांबरोबरच काही पौराणिक व ऐतिहासिक विषयही हाताळले. उत्तम कवी असल्याने त्यांच्या नाटकात पदेही असायची जातात.ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी,या गीतांमधून त्यांनी रसिकांच्या बरोबर ऋणानुबंध कायम प्रस्थापित केले.
'आई तुझी आठवण येते' हे हृदयस्पर्शी गीत त्यांनी रचले. हे गीत बालाजी पेंढारकरांनी स्वतः संगीतबद्ध करून मंचावर साभिनय गायले. 'मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला' हे गीत ऐकताना आपण जणू गोकुळात असल्याचा भास होतो, आली दिवाळी दिवाळी', 'उठी उठी गोपाला', 'गजाननाला वंदन करूनी', 'तू जपून टाक पाऊल जरा' ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत.नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नट ही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे.
( संकलीत )