द ओमेन

पुस्तकाचे नाव -  द ओमेन
लेखक - डेव्हिड सेल्टझर
अनुवाद - अरुण डावखरे
प्रकाशक - सुकृत प्रकाशन



वाड्मयीन इतिहासात भयकथांचा एक स्वतंत्र प्रवाह आहे. यात अमानवी जग, भुतप्रेत, सैतानी शक्तींचा प्रभाव, त्यावर मात करणारं देवत्व असा सृष्ट व दृष्ट शक्तींचा लढ्याचे वर्णन येते. सत्तरीच्या दशकात प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने अनेक विक्रम केले. या कथानकावरील सिनेमानेही चांगले यश मिळवले. 


कॅथी आणि थाॅर्न एकमेकांना अनुरुप असलेलं सुखी जोडपं होतं. स्वकर्तृत्वावर भरभराट करीत थाॅर्न आता राष्ट्राध्यक्षांचा आर्थिक सल्लागार झालेला होता. काही वर्षांपूर्वी हवेलीसारखं मोठे घर घेतलेलं होतं. शहरापासून जवळ असलं तरी जंगल दिसायचं. खोलीचं दार उघडं असलं तर जंगली प्राण्यांची गुरगुर प्रसंगी डरकाळ्याही ऐकू यायच्या. आपला जास्तीत जास्त वेळ कॅथीला देण्याचं ठरवूनही कामाच्या व्यापामुळे शक्य होत नव्हतं. लागोपाठ झालेल्या दोन गर्भपातामुळे मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या कॅथीला बाळ हवं होतं. आता ती तिसऱ्या वेळी गरोदर असतांना थाॅर्नने डाॅक्टरांच्या सल्ल्याने तिची काळजी घेत होता. 

कॅथरीनने बाळाला जन्म दिला तेव्हा थाॅर्न विमानतळावरून सरळ हाॅस्पिटलमध्ये आला तेव्हा रात्रीच्या काळोखात पसरलेल्या शांततेत फादर स्पिलिएंनी थाॅर्नला सांगीतलं की या वेळी त्याच्या पत्नीने मृत बालकाला जन्म दिला होता. कॅथीचा अपेक्षाभंग होऊन जिवीताला अपाय होऊ नये म्हणून फादरने जसं सुचवलं तसच थाॅर्नने केलं. त्याच वेळी बाळाला जन्म देताना मृत झालेल्या आईचे बाळ त्याने कॅंथीच्या कुशीत दिलं, 

काही दिवसांनी कॅथी बाळाला घेऊन चर्च मधे गेली तेव्हा त्या इवल्याशा जीवाने फार आकांत केला होता. म्हणून जे धार्मिक विधी करायचे होते ते चर्च ऐवजी घरी केले. त्याचं नाव ठेवलं डेमीन. त्याची आया चेसी त्याची सर्व प्रकारची काळजी घ्यायची. इतर नोकरचाकर भरपूर होते! 

डेमीन खूप शांत होता. त्याच्या वयाच्या मानाने हे फार विपरीत होतं! हवेली समोरच्या बाकावर बसून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बघत असायचा. आता तो तीन वर्षांचा झाला होता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आयोजित केलेल्या पार्टीत हार्बर जेनिंग हा पत्रकार ही आलेला होता. हवेली समोरच्या हिरवळीवर पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेत असतांना डेमीनची आया चेसी हवेलीच्या गच्चीवरून हाका मारीत डेनीमचं लक्ष वेधून घेत होती. अचानक तिने स्वत:ला गच्चीवरून झोकून दिले. तिच्या गळ्यातला दोरखंड ताठ झाला. तिचा मृतदेह तसाच लोंबकळत राहीला. 

हार्बर जेनिंगने जेव्हा कॅमेराचा रोल डेव्हलप करून डेनीमच्या वाढदिवसाचे फोटो बघीतले तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला. त्याने चेसीच्या मृत्यू अगोदर जे फोटो काढले होते त्यात चेसीच्या डोक्यावरचा दोरखंड प्रत्येक फोटोत धुरकटपणे दिसत होता. जेनिंग आता थाॅर्नचा पुर्वोतिहास शोधू लागत्लाय! 

चेसीच्या मृत्यू नंतर लगेच दुसरी आया बेलॅक हवेलीत आली. थाॅर्नला वाटले की तिला कॅथीने बोलवले, आणि कॅथीला वाटले की थाॅर्नने. तिला कोणी पाठवलं हे कोणालाही समजलं नाही. मात्र तिला बघून डेनीम खुष झाला होता. इतर नौकर वर्गात न मिसळता बेलॅक एकटीच डेनीमच्या आसपास राहायची. काही दिवसांनी एक काळा कुत्रा हवेलीत आला. डेनीमच्या खोलीबाहेर बसून राहिला. हाकलल्यावरही गेला नाही. डेनीम कुत्र्याशी खेळू लागला आणि नकळत तो कुत्राही हवेलीचा सदस्य झाला. 

त्यानंतर जेव्हा परत डेनीमला चर्च मधे नेलं तेव्हाही त्याने फार गोंधळ घातला, आकांडतांडव केलं, काही केल्या त्याला चर्चच्या आत जायचं नव्हतं! 

एकदा एक पाद्री थाॅर्नला भेटायला आला. डेनीमची जन्मदात्री कोण हे सांगीतल्यावर थाॅर्न हादरला होता. तो पाद्री बाहेर येतांना जेनिंग ने त्याचा फोटो काढला होता. त्यात त्याच्या डोक्यावर काही धुरकट आकृती दिसत होती. जशी चेसीच्या फोटोत दिसत होती. म्हणजे हा पाद्री मरणार होता, 

तो पाद्री काही दिवसांनी मेलेल्या अवस्थेत सापडला. पण मरण्यापूर्वी तो थाॅर्नला भेटला होता, आणि खरं काय ते सांगितले होते. तत्पूर्वी जेनिंग त्या पाद्र्याला भेटला होता. 

आता जेनिंग च्या मदतीने थाॅर्न या सगळ्याच्या मुळाशी जाऊन हे संपवणार होता. डेनीम त्याचा मुलगा नव्हता. त्याचा मुलाला मारून त्याच्या ठिकाणी डेनीमला ठेवण्यात आलं होतं कारण त्याला सुरक्षा हवी होती. राष्ट्राध्यक्षांच्या जवळच्या व्यक्ती शिवाय पुर्ण सुरक्षा कुठे मिळणार होती. शिवाय मिसेस बेलाॅक आणि तो काळा कुत्रा हे ही त्याचं सुरक्षा कवच होतं.  वयाची पाच वर्षे पूर्ण होताच त्याच्यातली दुष्ट शक्ती पुर्ण ताकदीने कार्यान्वित होणार होती. त्यानंतर सृष्ट शक्तीचे अस्तित्व संपणार होते. पण थाॅर्न आणि जेनिंग दृष्ट शक्तीच्या विरोधात उभे होते. 

मग सुरू होतो सृष्ट आणि दृष्ट शक्तीचा संघर्ष. हा संघर्ष वाचतांना मन घट्ट करावं लागतं.हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या लढृयाचं शब्दचित्र शरीराचा प्रत्येक रोम न रोम ताठ करते. जीवघेण्या प्रसंगाचं वर्णन भितीचा शहारा उमटवतं. 










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.