( ११ जुलै १८८९ - १४ नोव्हेंबर १९७१)
मराठी , कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक होते. ते किर्लोस्कर खबर (पहिले उपसंपादक), उद्यान, लोकमित्र तसेच आल्हाद साप्ताहिक व मधुकर या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. ‘आपटे मंडळी’ या नावाने प्रकाशनगृह स्थापन केले. प्रकाशन करण्यासाठी स्वतःचा ‘श्रीनिवास छापखाना’ कोरेगाव येथे सुरू केला.नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबऱ्या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे .
त्यांनी जवळपास साठ कादंबऱ्या लिहिल्या आहेत.त्यांतल्या थोड्याशा ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबऱ्या आहेत. त्यांची एकूण साहित्य-ग्रंथ संख्या सुमारे १०० इतकी आहे. इंग्रजांची परकीय नोकरी करावयाची नाही अशी हिंमत बाळगून केवळ लिखाण करून संसार करणारे ते काही लेखकांपैकी एक होत.नारायण हरी आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर प्रभातने ‘कुंकू’ चित्रपटाची निर्मिती करून जरठकुमारी विवाह ही त्या काळातील ज्वलंत समस्या चव्हाट्यावर मांडली. ट्रेलरची पद्धत कुंकू चित्रपटापासून सुरू झाली. ‘भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभातने ‘अमृतमंथन’ (१९३४) चित्रपटाची निर्मिती केली. बडोदा येथे भरलेल्या मराठी वाङ्मय परिषदेच्या (१९३३) तिसऱ्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष, पुणे येथे भरलेल्या दहाव्या शारदोपासक संमेलनाचे (१९४१) अध्यक्ष तर सातारा येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९६२) स्वागताध्यक्ष ही पदे भूषविली आहेत.
(संदर्भ - मराठी विश्वकोश)