( १९ ऑगस्ट १९०६ - १ जुलै १९८९ ) ,
रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिलेल्या ‘रानजाई’ काव्यसंग्रहाचे कवी. ‘रानजाई’तल्या कविता शांताबाई शेळके यांना खूप आवडल्या, कारण त्यांतल्या अनेक कवितांमध्ये पाटलांनी रंगवलेला निसर्ग.
रविकिरण मंडळाच्या कवींचा व तांबे यांच्या काव्याचाही दाट प्रभाव पाटलांवर पडला असून निखळ प्रांजलपणा हे पाटलांच्या कवितेचे ठळक वैशिष्ट्य आहे. प्रांजळपणाच्या जोडीला तिच्यात सहजता, अकृत्रिमता व सहजसुंदर बालभाव आहे. आपल्या अनुभवविश्वाशी इमान राखल्यामुळे ही गुणसंपदा तिला लाभलेली आहे. कृत्रिम, संकरभाषेचा वापर न करताही जानपद भाव व्यक्त करता येतो, हे पाटलांनी दाखवून दिले. ‘रानजाई’ला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा पुरस्कार, ‘लिंबोळ्या’ ला (१९६१) राज्य सरकार तर ‘पाखरांच्या शाळेला’ राज्य सरकार व केंद्र सरकार ह्यांचे पुरस्कार लाभले आहेत. १९८९ साली बालकुमार साहित्य संमेलनातर्फे पाटील यांचा गौरव करण्यात आला.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक, वि ग जोशी)