( १५ आक्टोबर १९२० - २ जुलै १९९९ )
हे इटलीतुन अमेरिकेत येवून स्थायिक झालेल्या गरीब अशिक्षित कुटुंबात जन्मलेले लेखक आणि पटकथा लेखक होते. द गॉडफादर या कादंबरीने जगविख्यात झालेले लेखक.
माफियाच्या एकंदर अंतरतचनेवर आणि एकूणच सर्व प्रकारच्या अंतरव्यापारावर झगझगीत प्रकाश टाकणारी मारिओ पूजेची गॉडफादर ही कादंबरी त्याला साहित्य क्षेत्रात आणि कला क्षेत्रात भरपूर समृद्धी पैसा आणि एक वेगळे स्थान देऊन गेली खरी पण ती त्याच्या वयाच्या 45 व्या वर्षी. अमेरिकेत सामाजिक मूल्ये जेव्हा उद्ध्वस्त होऊ लागली होती, तेथील कुटुंबव्यवस्था विस्कळीत होत होती, नीती-अनीतीमधील लक्ष्मणरेषा पुसट झाली होती आणि हिंसा हा केवळ गुन्हेगारी विश्वाचाच नव्हे तर दैनंदिन व्यवहाराचाही अटळ व अपरिहार्य आविष्कार झाला होता, त्या काळाचे विलक्षण प्रत्ययकारी चित्रण मारिओ पुझोने ‘द गॉडफादर’मध्ये केलेले आहे.
त्याच्या आधी आणि नंतरही त्याने बरीच साहित्यनिर्मिती केलीअगोदरच्या दोन्ही कादंबर्या सपशेल अपयशी ठरल्यानंतर मारिया पुझोला गाॅडफादर या कादंबरीने भरपूर कमाई करून दिली. त्यानंतर आलेल्या द सिसिलियन, द ओमार्ता, द लास्ट डाॅन याही गाॉडफादरशी बरोबरी करु शकल्या नाही.
( संकलीत)