(१२ जुलै १९१३ - १४ जुन २०१० )
भारतीय साहित्यातील प्रसिद्ध इंग्रजी लेखक.कादंबरीकार आणि इतिहासकार ही त्यांची मुख्य ओळख. कथा, कादंबऱ्या, चरित्रे व ललित लेखन, वृत्तपत्र स्तंभलेखन त्यांनी मोठ्या प्रमाणात केले. परंतु त्यांची ओळख वाचकांना प्रिन्सेस या कादंबरीमुळे झाली.
त्यानंतर त्यांची ए बेंड द गँगेस आणि मेन हू किल्ड गांधी ही दोन पुस्तके देशात आणि परदेशात गाजली. सूड आणि क्रौर्य यांचे रोमांचकारी दर्शन घडवणारी डिस्टंट ड्रम ही माळगावकरांची पहिली कादंबरी १९६० मध्ये प्रसिद्ध झाली.
ही त्यांची कादंबरी म्हणजे वसाहत काळात ब्रिटीश भारतीय सैन्यात इंग्रज आणि भारतीय यांचे परस्पर संबंध आणि सैन्यातले भारतीय आणि पाकिस्तानी सैनिक यांच्या नैतिक प्रश्नांविषयीही आहे. दि प्रिन्सेस ही त्यांची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती स्वातंत्र मिळाल्यावर संस्थानांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत सापडलेल्या बेगवाड नावाच्या संस्थानाची कहाणी सांगणाऱ्या या कादंबरीला खूप मोठे यश मिळाले.माळगावकरांना भारतीय इतिहासाचे खूप आकर्षण होते. त्यांनी कान्होजी आंग्रे द सी हॉक मराठा ऍडमिरल,(याचा अनुवाद पु ल देशपांडे यांनी केला होता)पुअर्स ऑफ देवास, सिनियर आणि छत्रपतीज ऑफ कोल्हापूर हे इतिहास ग्रंथ लिहिले. द मेनू हू किल्ड गांधी हे त्यांचे गाजलेले पुस्तक म्हणजे भारताची फळणी, स्वातंत्र्य आणि गांधीजींचा खून याचा पुनर्प्रत्यय आहे. वेधक कथावस्तूची निवड, कथनाचे कौशल्य, नाट्यमय प्रसंगांची विखुरणी ही माळगावकरांच्या कथा-कादंबऱ्याची लक्षणीय वैशिष्ट्ये आहेत.
( संदर्भ - मराठी विश्वकोश, राजेंद्र पोंदे )