पुस्तकाचे नाव - संदेह
लेखक - रत्नाकर मतकरी
मानवी मनाच्या अंतरंगातील खळबळ स्वभाव वैशिष्ट्यासह उलगडून दाखवणाऱ्या हा दहा कथांचा संग्रह. प्रत्येक कथा संशयाच्या धुक्यात गुरफटवून शेवटपर्यंत ताण वाढवत नेणारी.
पहिल्या कथेत डॉ. हर्ष एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याची कुजबुज असल्याने प्रॅक्टिस सोडून तो एका हाॅसस्पिटलमध्ये नौकरी करतो. तेथील संचालिका विवाहित असूनही त्याच्या प्रेमात पडते.आणि घटस्फोटाच्या अगोदर तिचा पती मरतो....
बंदुक ह्या कथेत मतीमंद मुलाच्या हाती शाळेच्या नाटकात खेळण्यातल्या ऐवजी खरी बंदुक कोणी दिली. ज्या मुळे त्याच्या आईचाच मृत्यू झाला.
तिखट गोड ह्या कथेत लहानपणी आलेल्या पक्षाघाताने खुर्चीला खिळलेल्या मुलाच्या भविष्याच्या काळजीने अत्यंत टोकाचं पाऊल उचलणारी आई.
अपघातवार कथेत मित्राचे आपल्या पत्नीशी संबंध आहे या संशयाने त्याचा खुन करण्याचा मार्ग शोधणारा ॠत्त्विक.
सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडल्यावर जगण्याचे ध्येय नाही म्हणून मृत्यूची परवानगी मागणारे बावडेकर.त्यांचे हे मनोगत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यावर त्यांना मिळालेला अकल्पनिय प्रतिसाद.
शोभना शिरोळेला अभिनेत्री व्हायचं होतं. पण झाली सिनेपत्रकार. मासिकात तिने लिहिलेल्या लेखांमुळे तिने काही प्रस्थापितांचे शत्रुत्व ओढवून घेतलेलं. त्यापासून वाचण्यासाठी केलेल्या तडजोडी तिच्यासमोर धोकेदायक पणे उभ्या राहतात.
जुळेपणाचा फायदा घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणारा किरण चौधरी, तरुण आणि सुंदर दिसणारी घनरानी, बालपण गरीबीत गेल्यावर ज्याच्यावर प्रेम केलं त्याने दुर्लक्ष केल्यावर फक्त पैशासाठी तीन लग्ने करणारी, तिघेही श्रीमंत, साठीच्या असपासचे, लग्नानंतर दोन तीन वर्षांत मृत्यू पावलेले. त्यांच्या पश्चात तिला मिळालेल्या संपत्तीतून खुप दानधर्म करणारी एकाच शाळेत दोन मुलांमध्ये दिसणाऱ्या विलक्षण साधर्म्यामुळे नियतीने खेळलेला विचित्र खेळ.
श्वास रोखून लावणाऱ्या या दहा कथा. मानवी मनाचे खेळ दाखवणाऱ्या, कधी मनाची उंची मोजणाऱ्या तर कधी तळ गाठणाऱ्या या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा मनाचा ठाव घेतांना अकल्पित धक्काही देतात.