एडगर राइज बरोज

एडगर राइज बरोज 



( १ सप्टेंबर १८७५ - १९ मार्च १९५९ ) 

टारझन हे नाव न ऐकलेलं क्वचितच कोणीतरी असेल. एका इंग्लिश उमरावाचा मुलगा आई वडिलांचे छत्र हरवून आफ्रिकेच्या निबिड अरण्य एप्सच्या टोळी सोबत वाढतो. डोळ्याचं पातं लावताना लावतो तोच वेलींच्या आधारे  एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तिथून तिसऱ्या झाडावर असा लिहिलया प्रवास करू शकतो. 




अंगावर फक्त एक व्याघ्राजीन, कमरेला लटकणारा धारदार सुरा, मानेवर रुळणारे केस आणि पिळदार शरीरयष्टी. एडगर राइज बरोज ने टारझन या पात्राची पहिली कथा लिहिली १९१२ मधे. बघता बघता टारझन इतका लोकप्रिय झाला की बरोजने टारझनवर २६  कादंबऱ्या लिहिल्या. हॉलीवुड निर्मात्यांच या हिरो वर गेल्या शंभर वर्षांपासून सिनेमे बनवनं सुरुच आहे. टारझन वर कॉमिक्स व ॲनिमेशन फिल्म सुद्धा बनल्या. 




मंगळ सफारी करणारा जॉन कार्टर हा दुसरा मानसपुत्र विज्ञान कथा चाहत्यांमध्ये लोकप्रिय होता. बरोज येणे ८० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यात विज्ञान,साहस,अद्भुत, चमत्कारिक कथा असे विविध कथा प्रकार हाताळले.दुसऱ्या महायुद्धात त्यांनी अमेरिकेतर्फे युद्ध वार्ताहार म्हणून सुद्धा काम केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.