द गोल्डन राॅन्देव्हू

पुस्तकाचे नाव - द गोल्डन राॅन्देव्हू
लेखक - एलिस्टर मॅक्लिन
अनुवाद - अशोक पाध्ये





द गोल्डन राॅन्देव्हू म्हणजे सोनेरी संकेतस्थळ किंवा भेटीची जागा.. ही जागा होती खवळलेल्या भर समुद्रात....

एस एस कंपारी हे प्रचंड मोठे मालवाहू जहाज असले तरी त्यावर काही जागा प्रवाशांसाठी राखीव होती समुद्र सफरीचा आनंद उपभोगणाऱ्या लोकांसाठी आलिशान केबीन्स, उंची मद्यालये, डान्स हाॅल, शिवाय वायरलेस यंत्रणेद्वारे शेअर मार्केट मध्ये उलाढाल करण्याची सुध्दा सोय होती. या सफरीचे भाडे फक्त गर्भश्रीमंतांनाच परवडू शके. 

डॉ. स्लिग्न्जबी कॅरोलिन या अणुशास्त्रज्ञ अमेरिकन सरकारच्या शस्रास्र संशोधन व विकास या संस्थेत काम करीत असताना खांद्यावर वाहून नेल्या जाणाऱ्या छोट्या राॅकेट लाॅंचरमधून उडवता येइल असा अणुबॉम्ब बनवला होता. एका दिवशी हा शास्त्रज्ञ नाहीसा झाला. त्याने बनवलेल्या अणुबॉम्बसह. त्याची गाडी ज्या बंदरापाशी सापडली त्या बंदरातून काही तास अगोदर एस एस कंपारी निघाली होती. त्यामुळे संशयाचा काटा या जहाजाकडे वळला. अगदी कसुन तपासणी केल्यानंतर काहीही न सापडल्यामुळे जहाजाला जाऊ दिले. यामुळे जहाजाच्या अधिकाऱ्यांना व प्रवाशांना खुप मनस्ताप सहन करावा लागला. प्रवासाचं वेळापत्रकही मागे पडलं होतं. 

प्रवास पुढे सुरू होताच बातमी आली की, प्रवाश्यांपेकी दोन प्रवाश्यांच्या कुटूबातील काही व्यक्ती मोटार अपघातात मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे पुढच्या बंदरात त्यांनी जहाज सोडले. त्या प्रवाशांच्या जागेवर प्रतिक्षा यदीतील एका कुटुंबाचा समावेश झाला. त्यांच्याकडे भरपूर सामानाचे पेटारे व  तीन शवपेट्या होत्या. पैकी एक शवपेटी सिनेटरची होती. सोबत राजदुताचे पत्र असल्याने  कॅप्टन नकार देऊ शकला नाही. 

पुढचा प्रवास सुरू होऊन काही तास उलटल्यानंतर जहाज भर समुद्रात आल्यावर जहाजावरचा मुख्य वेटर बेपत्ता झाला. खुप शोधाशोध करूनही तो सापडला नाही. त्यानंतर वायरलेस ऑपरेटर मृतावस्थेत आढळला. डॉक्टरांनी हार्ट ऍटक ने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला

कॅप्टन या घटनांमुळे चक्रावून गेला. जहाजाच्या फर्स्ट ऑफीसरला वेगळाच संशया येऊ लागला. संपूर्ण जहाजाची, प्रवाशांच्या सगळ्या केबिन्सची बारकाईने तपासणी करुनही काही आक्षेपार्ह सापडत नव्हतं. जहाज भर समुद्रात असतांना बाहेरचं कोणी येणही शक्य नव्हतं. अशातच जहाजाच्या एका कर्मचाऱ्याचे गोळ्या घातलेलं प्रेत सापडलं... फर्स्ट ऑफीसरने वायरलेस ऑपरेटरचा मृत्यू हार्ट ऍटक ने नाही तर घातपाताने झाल्याचं ठासून सांगीतलं. बदली आलेल्या प्रवाश्यांवर संशय व्यक्त केला. आता तो त्याच्या पध्दतीने खुन्याचा शोध घेणार होता. 

प्रतिक्षा यादीत तळाला असलेल्या प्रवाश्याला प्राधान्यक्रम डावलून कसे काय घेतले गेले. त्यांच्या देशात परकीय चलनाला बंदी असुनही त्याने डाॅलरमध्ये कसे तिकीट काढले. अचानक कळवुनही इतक्या कमी वेळेत इतके सामान कसे तयार ठेऊ शकले. कस्टम मधून इतक्या कमी वेळात तपासणी कशी होऊ शकली, की  झालीच नाही. राजदुताच्या सिफारशीने राजकीय हस्तक्षेप झाल्याचं लक्षात येत होतं. म्हणजे असं काहीतरी घडून आपल्याला जहाजावर प्रवास करायला नक्की मिळणार हे त्यांना अगोदरपासून माहीत होते का, प्रवास अर्धवट सोडून गेलेल्या प्रवाश्यांच्या  कुटुंबातील व्यक्तींच्या अपघाती मृत्यू होता की घातपात....

फर्स्ट ऑफिसरला अनेक प्रश्नांची उत्तरे हवी होती. तो सगळं शोधणार होता.. अजून एक शंका त्याला भेडसावत होती. अणुबॉम्ब सह बेपत्ता झालेला शास्त्रज्ञ आपल्या जहाजावर वेश बदलून आला तर नाही ना...? 

ऍलिस्टर मॅक्लीन यांच्या कादंबऱ्यांमधले नायक पराक्रमाचं अंतिम टोक तर गाठतातच, पण त्याबरोबरच लेखकाच्या कल्पकतेमुळे कथानक अतिशय खिळवून ठेवणारं आणि उत्कंठावर्धक होत जातं. 

लेखनाच्या हुकमी पत्त्यांपैकी सगळ्यात मोठा पत्ता म्हणजे कल्पनेच्या पलीकडचे मिळणाऱ्या कलाटण्या. या कादंबरीतही त्या पदोपदी अचानकपणे येतात आणि अनपेक्षितपणे धक्का देतात. 

१९६२ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरीचा २००४ मध्ये मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. 



 

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.